Sign in or 

| महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शिवरायांचे आठवावे रूप आठवावा प्रताप हेच आपुले बोधवाक्य. प्रथम सर्व मराठी बांधवांना माझा जय महाराष्ट्र!! आणि मनःपूर्वक स्वागत. आपण सर्व मराठी बांधव एकत्र येऊन या महाराष्ट्रात शिवरायांचा आदर्श ठेवून,आधुनिक मराठीस्वराज्य व साम्राज्य निर्माण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयतनात आपण सहभागी होवूनआपणा सर्वांसाठी व आपल्या अस्तित्वासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. मराठीही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे.महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी१)व भारतातील चौथी भाषा आहे.२) मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे.३)मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे.मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे. किल्ले मराठी म्हणजे मराठी मातीचा सर्वांगीण विकास.पण, इतिहासाची जोड देऊन आधुनिक पद्धतीने. आता वेळ आळी आहे ती म्हणजे आधुनिक मराठी स्वराज्य व साम्राज्या स्थापनेची.आपल्या स्वराज्यातील किल्ले,माणसे व महाराष्ट्राची राजभाषा अर्थात मायमराठी ह्या अमूल्य व जिव्हाळ्याच्या गोष्टींचे संरक्षण करण्याची.आणि अर्थातच या सर्व गोष्टींबरोबर स्वराज्याचा आर्थिक विकास साधण्याची.त्यासाठी ह्या किल्ल्यावर एकत्र येवून काही खास व अनोख्या आणि अर्थात प्रभावी मोहिमा आखायच्या आहेत.एवढेच नाही तर मराठी विषयक प्रत्येक गोष्टीचा एका वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून मराठी स्वराज्याचे तोरण उभारायचे आहे.त्यासाठी आपण सर्व जणांचे खास सहकार्य अपेक्षित आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न धरता आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी एकत्र येवून मोहिमा आखण्यास सुरुवात करूयात. महाराष्ट्राचा महापुरुष हा लेख वाचण्यास विसरू नका. हा लेख डाव्या बाजूला मराठी वेबसाईट सूची या विभागात त्याच्या उपविभागात सादर करण्यात आला आहे. | |
rajesuyash |
Latest page update: made by rajesuyash
, Aug 24 2010, 7:33 AM EDT
(about this update
About This Update
Edited by rajesuyash
14 words added view changes - complete history) |
|
Keyword tags:
None
More Info: links to this page
|